बिहार निवडणुकीत विजय आपलाच होणार... फडणवीसांचा विश्वास...वेब टीम : मुंबई

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 


भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. 


भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.


त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला.भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. 


त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन. यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाच्या कामांमुळे बिहारची जनता मोदींना मानत आहेत. 


लवकरच मित्रपक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा करून तिढा सोडवला जाईल. 


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कामांचा मोबदला या निवडणुकीत मिळेल, असा दावा फडणवीस यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post