भाळवणीत पहाटे फिरायला गेलेल्या महिलेवर हल्ला डोक्यावर टणक हत्याराने वार भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी जामगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २५...
भाळवणीत पहाटे फिरायला गेलेल्या महिलेवर हल्ला
डोक्यावर टणक हत्याराने वार
भाळवणी :
पारनेर तालुक्यातील भाळवणी जामगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २५) पहाटे फिरायला गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. डोक्यावर टणक हत्याराने वार करीत जखमी केले असून, पहाटे फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दररोज पहाटे गावातील पुरुष, महिला, तरुण गावालगतच्या जामगाव रस्ता, टाकळी ढोकेश्वर रस्ता, नगर रस्ता, आदी परिसरात फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) जात असतात. रोजच्या प्रमाणे ती महिला पहाटे जामगाव रस्त्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. अचानक अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
COMMENTS