--> उमेदवार पाडल्याचा राग येऊन सरपंचाने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा केला बंद | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

उमेदवार पाडल्याचा राग येऊन सरपंचाने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा केला बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)-  निवडणुकीत दोन उमेदवार पाडल्याचा राग येऊन नगर तालुक्यातील शहापूर येथील ग्रामस्थांचा मागील दहा महिन्यापासून पाणीपुरवठा स...



अहमदनगर (प्रतिनिधी)- 
निवडणुकीत दोन उमेदवार पाडल्याचा राग येऊन नगर तालुक्यातील शहापूर येथील ग्रामस्थांचा मागील दहा महिन्यापासून पाणीपुरवठा सरपंचाने बंद केल्याचा आरोप करुन, सरपंचावर कारवाई करुन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणात दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, जिल्हा युवक अध्यक्ष सुरेंद्र घारु, ग्रामपंचायत सदस्या पूजाताई दारकुंडे, दिक्षा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नाना उबाळे, प्रविण जाधव, सनी खरारे, राहुल लखन, धीरज सारसर, अर्चना सत्रे, प्रदीप पवार, रफिक शेख, केशर दारकुंडे, ठकुबाई गाडेकर, भारती दारकुंडे आदींसह ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.
शहापूरचे सरपंच यांनी जाणून-बुजून गावाचा पाणीपुरवठा बंद केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सरपंचाकडे वेळोवेळी मागणी केली. उमेदवार पाडल्याचा राग मनात धरुन त्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.  सदरची बुर्‍हाणनगर पाणीयोजना आमदार शिवाजी कर्डिले यांनी 40 गावासाठी आणली. मात्र सरपंच जाणून बुजून गावकर्‍यांना त्रास देण्यासाठी वेठीस धरत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रार करुनही ग्रामस्थांना पाण्याबाबत न्याय मिळालेला नाही. पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित ठेवण्याचे पाप सरपंच करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर गोरगरीब लोकांच्या घरकुलांचे प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयमध्ये धूळखात पडले असून, ते पंचायत समितीकडे मंजूरीसाठी देखील पाठविण्यात आलेले नाही. सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेऊन काम करत नसून, ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
दहा महिन्यापासून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणार्‍या सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्याचे सरपंचपद रद्द करुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, गावाला पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत ग्रामसभा घेऊ नये, ग्रामपंचायतमध्ये झालेल्या मागील दहा महिन्यातील सर्व कामाची तपासणी करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: उमेदवार पाडल्याचा राग येऊन सरपंचाने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा केला बंद
उमेदवार पाडल्याचा राग येऊन सरपंचाने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा केला बंद
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgFCkzCU_OmdbLr8h8U-DFc4kexgtCaL5w52J-4DDyzO_vM5Q7qfDDp1Pjy9avMsfOxFQ756gkclI2viyEVdgvTzmaGtQoveAZevCqXE8iTYLh7XsprnzgmmRnmI929t7bBdZUarEsIHyqlfen_7OFByOqEA87ob0GXP0nBhKt1Cwdq3h3rkBpXaun4=w640-h426
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgFCkzCU_OmdbLr8h8U-DFc4kexgtCaL5w52J-4DDyzO_vM5Q7qfDDp1Pjy9avMsfOxFQ756gkclI2viyEVdgvTzmaGtQoveAZevCqXE8iTYLh7XsprnzgmmRnmI929t7bBdZUarEsIHyqlfen_7OFByOqEA87ob0GXP0nBhKt1Cwdq3h3rkBpXaun4=s72-w640-c-h426
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/11/Sarpanch_0969315775.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/11/Sarpanch_0969315775.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content