वेब टीम : मुंबई महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस चांगलाच पेटला आहे. दोन्हीही पक्षाच्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आज मुंबई पोलिसांन...
वेब टीम : मुंबई
महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस चांगलाच पेटला आहे. दोन्हीही पक्षाच्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करत या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज काँग्रेस आंदोलन करणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसा इशारा दिला होता. यानंतर दोन्हीही पक्षाची नेतेमंडळी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेली बघायला मिळत आहेत.
फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केल्यास जशास तसे उत्तर देऊ असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी सायन सर्कल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
COMMENTS