किरण ठुबे यांना आमदार लंकेंनी राजकीय प्रक्रियेत घ्यावे : सचिन वराळ ठुबे यांच्या वाढदिवसा निमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पारनेर/प्रतिनिधी ...
किरण ठुबे यांना आमदार लंकेंनी राजकीय प्रक्रियेत घ्यावे : सचिन वराळ
ठुबे यांच्या वाढदिवसा निमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पारनेर/प्रतिनिधी :
पठार भागावरील एक आक्रमक नेतृत्व असलेले किरण ठुबे यांना आमदार निलेश लंके यांनी पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे असे मत संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष निघोज ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ यांनी किरण ठुबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केले किरण ठुबे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार या त्यांच्या मूळ गावी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान कान्हूरपठार येथे जनता राजा प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष किरण ठुबे व समस्थ ग्रामस्थ कान्हूरपठार यांच्यावतीने पंचरत्न चषक भव्य अंडर आर्म क्रिकेट नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचरत्न चषक स्पर्धेचे उद्धघाटन युवा नेते दीपक लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, माजी सभापती राहुल झावरे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, चंद्रभान ठुबे, गवराम नवले , अमोल साळवे, बाबाजी लंके, रामभाऊ तराळ, मंगेश लाळगे, कैलास कोठावळे, अनिल गंन्धाकते, बापू खंदारे, मारुती रेपाळे, नामदेव ठाणगे, सुनील चव्हाण, सत्यम निमसे, शिवाजी शेळके, बी. एल. ठुबे, विजय काकडे, विवेक ठुबे, उमेश घोडके, राजेंद्र व्यवहारे, सुभाष परांडे, प्रकाश चिकने, सुभाष वराळ, पोपट नवले, योगेश जाधव, प्रितेश पानमंद,
स्वप्नील ठुबे, दत्तात्र्य ठुबे, संजू सोनावळे, आकाश सोनावळे, सागर ठुबे, राहुल कोल्हे, तुषार ठुबे, विशाल ठुबे, सुभाष ठुबे, हरिश्चंद्र व्यवहारे, किरण लोंढे, अमोल सोनावळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये ११,१११ माजी आमदार नंदकुमार झावरे सामाजिक प्रतिष्ठान पारनेर यांच्यावतीने देण्यात आले आहे. द्वितीय बक्षीस रुपये ७,७७७ शिवाजी व्यवहारे, शिवाजी शेळके, चंद्रभान ठुबे, श्रीकांत ठुबे यांच्या वतीने देण्यात आले आहे. तृतीय बक्षीस रुपये ५,५५५ शिवसेना पारनेर तालुका संपर्क प्रमुख गवराम नवले यांच्या वतीने देण्यात आले आहे. चतुर्थ बक्षीस रुपये ३,३३३ स्वप्नील ठुबे व प्रमोद गायकवाड यांच्या वतीने देण्यात आले आहे.
तसेच उत्कृष्ट खेळंडूना देखील पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान स्पर्धातील सामने दररोज रात्री ८.३० वाजता खेळविण्यात येणार असून १२ एप्रिल रोजी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.
COMMENTS