वेब टीम : मुंबई चित्रपटाच्या जवळपास 1000 कोटींच्या कलेक्शनमुळे 'RRR'च्या संपूर्ण टीमचा आनंद सातव्या गगनाला भिडला आहे. या प्रचंड आनंद...
वेब टीम : मुंबई
चित्रपटाच्या जवळपास 1000 कोटींच्या कलेक्शनमुळे 'RRR'च्या संपूर्ण टीमचा आनंद सातव्या गगनाला भिडला आहे. या प्रचंड आनंदाच्या प्रसंगी, चित्रपटाची सक्सेस पार्टी मुंबईत आयोजित करण्यात आली होती,
ज्यामध्ये बॉलीवूड स्टारकास्ट ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि 'RRR' चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचवेळी बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानही 'RRR'च्या सक्सेस पार्टीला पोहोचला होता
एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' ( RRR Movie ) चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. 'आरआरआर' चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसह तुफान कमाई केली आहे.
या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्याचबरोबर आता जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 1000 कोटींची कमाई केली आहे.
या अगोदर चित्रपटाची एकूण कमाई 12 व्या दिवशी 1000 हजार कोटींच्या जवळ पोहोचली होती. .
हा चित्रपट 25 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
त्यानंतरही चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या चित्रपटाच्या 1000 कोटींच्या कलेक्शनवर मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये सक्सेस पार्टी झाली.
दिग्दर्शक राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी मिळून केक कापला.
COMMENTS