नीलेश लंके प्रतिष्ठानला जागा न देण्यासाठी 'पारनेर बंद'ची हाक पारनेर प्रतिनिधी: पारनेर शहरातील सुपा रोड लगत गट नंबर ९६ मधील १६ एकर र...
नीलेश लंके प्रतिष्ठानला जागा न देण्यासाठी 'पारनेर बंद'ची हाक
पारनेर प्रतिनिधी:
पारनेर शहरातील सुपा रोड लगत गट नंबर ९६ मधील १६ एकर रोकडोबा देवस्थान ट्रस्टची जागा निलेश लंके प्रतिष्ठान यांनी दवाखान्यासाठी मागणी केली आहे. परंतु ही जागा लंके प्रतिष्ठानला देण्यास शिवसेना नगरसेवक व ग्रमस्थांचा विरोध असल्याने ही जागा प्रतिष्ठानला देऊ नये. म्हणून शनिवार दि. ९ जुलै रोजी पारनेर ग्रामस्थांच्या वतीने पारनेर बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी दिली आहे.
गट नं.९६ जागेमध्ये सुसज्ज शासकीय दवाखान्याची इमारत आहे. तेथे अनेक सुविधा नाही, तज्ञ डॉक्टर नाही, कुत्रं चाललंय तरी घाईघाईने इलाज नाही, सर्प दंश झालातरी तर इलाज होईल याची खात्री नाही याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. फक्त पारनेरची मोक्याची जागा बळकवण्याचा हेतू ठेऊन पारनेरकरांची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे.
हीजागा पारनेर नगरपंचायतीकडे वर्ग केल्यास पारनेर शहरातील अनेक गरीब लोकांना घरकुल मिळतील. तसेच याच जागेत न्यायालय होणार आहे. क्रीडासंकुल आहे, तसेच जागा रोड लगत आहे तेथे पारनेर नगरपंचायत मार्फत व्यापारी संकुल उभारून पारनेरच्या गोरगरीब तरूणांना व व्यापारी वर्गाला व्यवसाय करण्याची संधी मिळेल. म्हणून ही जागा निलेश लंके प्रतिष्ठानला देण्यात येऊ नये. म्हणून पारनेर शहर शनिवार दि. ९ रोजी स्वतः हुन बंद ठेवण्याचे आवाहन पारनेर ग्ररामस्थ व भाऊसाहेब खेडेकर यांनी केले आहे.
COMMENTS