चालकाच्या सतर्कतेमुळे कारमधील पाच जणांचे वाचले प्राण नगर-पुणे मार्गावर जातेगाव घाटातील प्रकार पारनेर प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावर अपघात ...
चालकाच्या सतर्कतेमुळे कारमधील पाच जणांचे वाचले प्राण
नगर-पुणे मार्गावर जातेगाव घाटातील प्रकार
पारनेर प्रतिनिधी :
नगर-पुणे महामार्गावर अपघात मालिका चालुच असुन शुक्रवारी पहाटे जातेगाव घाटात खाजगी बस चालकाच्या सावधगीरीमुळे कार मधील चार पाच व्यक्तीचे प्राण वाचले.
याबाबत सुपा पोलिस स्टेशनचे साह्यक फौजदार सुनिल कुटे यांनी सांगितले कि शुक्रवारी पहाटे सुपा पोलिस स्टेशनचे कर्मचारी महामार्गावर गस्त घालत आसताना वायारलेस वर संदेश आला कि जातेगाव घाटात अपघात झाला आहे. घाटनेची माहिती कळताच कुटे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले कि जातेगाव घाटातील हाँटेल विनायक स्मृती येथुन माल ट्रक ( क्र MH -12 FZ -3287 ) हाँटेल कडून रस्ता ओलाडून पुण्याच्या दिशेला वळत आसताना त्याच वेळी अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने इनोव्हा
कार क्रमांक MH 43 L 4434 ही त्या वळणा घेत आसलेल्या ट्रकवर आदळली या दोन्हीत आपघात झाला असताना बरोबर त्याच वेळी अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात आसलेल्या खाजगी बस ( लक्झरी ) क्रमांक MP 41 T 1564 या बस चालकाच्या नजरेस समोर अपघात झाल्याचे नजरेस आले त्यांने प्रसंगावधान पाहून पन्नास ते शंभर फुट बस रस्ता दुभाजकावर ओढली व समोरील कार मधील चार ते पाच व्यक्तीचे प्राण वाचवले. लक्झरी चालकाने गाडी दुभाजकावर नस्ती घातली तर ट्रक व लक्झरीच्या मध्ये इनोव्हा कारचे व त्यामधील प्रवाशाचे मोठे नुकसान झाले आसते, या अपघातात चार पाच व्यक्ती जखमी झाल्या असुन त्यांना सुपा पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे .
» सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे हे नगर-पुणे महामार्गावर अपघाती क्षेत्राचे पुनर्रसर्वेक्षण करणार असून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करणार असल्याचे सुपा पोलिसांकडून सांगण्यात आले.
COMMENTS