निघोजमध्ये राष्ट्रवादी आक्रमक महावितरण विरोधात 'रास्ता रोको' वाढीव बिल कमी करण्याचे आश्वासन पारनेर/प्रतिनिधी : महावितरण ने दिल...
निघोजमध्ये राष्ट्रवादी आक्रमक महावितरण विरोधात 'रास्ता रोको'
वाढीव बिल कमी करण्याचे आश्वासन
पारनेर/प्रतिनिधी :
महावितरण ने दिलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात निघोज (ता.पारनेर)येथे आज (ता.२) रोजी बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी पारनेर तालुक्यातील अनेक वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना या आंदोलनाचा फायदा
होणार असून शंभर युनिटच्या आतील 3.36 दराने विज बिल आकारणी होणार असुन ज्यांची जास्त वीज बिल आकारणी करा म्हणून मीटर तोडण्यात आले आहे ते लवकरात लवकर बसून देण्यात येतील संपूर्ण चौकशी करूनच यापुढे वीज बिल पाठवण्यात येईल आसे आश्वासन महावितरण पारनेरचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई ,निघोजचे सहाय्यक अभियंता गौरव चरडे यांनी दिले.
यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेश सरडे,निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद, उपसरपंच माऊली वरखडे,सोमनाथ वरखडे, बाळासाहेब लंके,शिरापूरचे सरपंच गुंडा भोसले, संतोष शिनारे,शांताराम कवाद,मंगेश मुळे,अनंतराव वरखडे,योगेश वाव्हळ,अर्जुन लामखडे,रमेश ढवळे,मंगेश लंके ,भरत ढवळे, दिलीप कवाद,दिलीप ढवण,सुभाष पुंडे
सरपंच किरण पानमंद उपस्थित होते.
COMMENTS