आला... पाऊस आला..., राज्यात काही ठिकाणी बरसणार


DNALive24 : पुणे
प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण होण्यास सुरूवात झाली असून, शनिवारपासून विदर्भ आणि कोकणात, तर 1 तारखेपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच 2 जूनला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अजून मान्सून पूर्व पाऊसही न आल्याने शेतकऱ्यांसह प्रत्येक जण पावसाची वाट पाहतोय.

त्यात मुंबईसह राज्यभरात नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. पण आयएमडीच्या अंदाजामुळे आता पावसाच्या आगमनाची उत्सुकता ताणली आहे. 3 आणि 4 जूनलाही राज्याच्या काही भागात पूर्व मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यंदाचा भीषण दुष्काळ पडलेला असल्याने राज्यभरात बळीराजाचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत. येत्या १० ते १५ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates