विधानसभेला 50-50 चा फॉर्म्युला – दानवे


वेब टीम, पुणे
लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात युती होणार आहे. आमच्यात निम्म्या-निम्म्याचा फॉर्म्युला ठरला असून निवडणुकीत विधानसभेवर भगवाच फडकेल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्‍त केला.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्‌घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी (दि.10) झाले. त्यानंतर संत तुकारामनगर येथे दानवेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले. त्यामुळेच घवघवीत यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती होणार आहे. आमचा निम्म्या-निम्म्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post