केडगावात भाईगिरी वरून राडा ; 307 नुसार गुन्हे दाखल


वेब टीम : अहमदनगर
केडगावात भाईगिरी वरून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. बुधवारी(दि.12) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास केडगाव वेशीजवळ सोनेवाडी चौकात ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या असून पोलिसांनी 307 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आकाश अशोक पवार, सचिन किसन पवार, एक अनोळखी इसम, अप्पा मतकर, नामदेव अनिल सातपुते, गोट्या अनिल सातपुते, अनिल सातपुते, अक्षय मोडवे अशी दोन्ही गटातील आरोपीची नावे आहेत.

सुनिल अनिल सातपुते  हा याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची सोनेवाडी चौकात मळगंगा पान स्टॉल नावाची टपरी असून त्या टपरीवर तो बसलेला असताना त्याची आई टपरीवर आली तो आईसोबत घरगुती विषयावर बोलत असताना क्रांती चौक केडगाव येथे राहणारे आकाश अशोक पवार, सचिन पवार व अन्य एक अनोळखी इसम असे तिघेजण आले. त्यातील आकाश पवार याने तु काय भाई झाला आहेस का असे म्हूणन शिवीगाळ केली तेव्हा त्याची आई आकाश यास म्हणाली तु माझ्या मुलाच्या नादी लागू नकोस असे म्हणताच आकाश याने सुनिल याला टपरीच्या बाहेर ओढले व सचिन पवार व अनोळखी इसमाने त्याला धरले असता आकाश याने त्याच्या कमरेचा चाकू काढून त्याच्या गुप्त भागावर मारला. तसेच जिव जाण्याच्या उद्देशान छातीवर मारला. परंतु तो वार सुनिल याने चुकविल्याने त्याच्या दंडावर चाकू लागून तो जखमी झाला. यावेळी त्याची आई भांडणामध्ये पडली असता तिच्याही हाताच्या मनगटावर चाकू मारल्याचे फिर्यादीत फिर्यादीत म्हटले आहे.

तर दुसरी फिर्याद आकाश अशोक पवार (वय-25,रा. केडगाव) यांने दिली आहे. पवार याचे अंबिकानगर पाण्याच्या टाकीजवळ आकाश जनरल स्टोअर्स नावाचे स्टेशनरी दुकान आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता आकाश हा नेहमीप्रमाणे सिगारेट पिण्यासाठी सोनेवाडी चौक, केडगाव येथे गेला असता त्याने तेथील एका टपरीतून सिगारेट घेऊन सिगारेट पेत चौकात उभा राहिला असता त्याने सहज नामदेव सातपुते यांच्या पानटपरीकडे पाहिले. त्यावेळी तेथे अक्षय मोढवे हा त्याच्याकडे पाहून मोबाईलवर कोणाशीतरी बोलत होता. त्यानंतर 10 मिनिटांतच तेथे नामेदव अनिल सातपुते, गोट्या अनिल सातपुते, अनिल सातपुते, आप्पा मतकर (पुर्ण नाव माहिती नाही) हे आले. त्यातील आप्पा मतकर याने आकाश यास हाताच्या इशार्‍याने बोलावून तु आमच्या टपरीकडे पाहण्याचा काय संबंध असे म्हणून त्याने झापडीने मारले. आकाश याने त्याला धरण्याचा प्रयत्न केला असता टपरीमागून अनिल सातपुते, गोट्या सातपुते, अक्षय मोढवे यांनी येवून शिवीगाळ करीत त्यास मारण्यास सुरुवात केली. म्हणून घाबरुन आकाश रस्त्याने पळू लागला असता पाच जणांनी त्याचा पाठलाग करुन केडगाव वेशीजवळ त्याला पकडले. आप्पा मतकर याने त्यावर तलवारीने वार करुन जखमी केले. नामेदव सातपुते याने लोखंडी रॉडने तर गोट्या सातपुते व अनिल सातपुते यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates