वेब टीम अहमदनगर - तीन दिवसापूर्वी विवाहबद्द झालेली वधू-वराची जोडी लगीन गाठीसह लग्नाच्या वेशात मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासा...
वेब टीम
अहमदनगर -
तीन दिवसापूर्वी विवाहबद्द झालेली वधू-वराची जोडी लगीन गाठीसह लग्नाच्या वेशात मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी आली. वाहन तळाकडे नवरदेव मोटार सायकल आणायला गेला नवरीने नवऱ्याच्या हातावर तुरी देत केले पलायन. हा संपुर्ण प्रकार देवस्थान समितीच्या कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील एक नवविवाहीत जोडी देवदर्शनासाठी मढीला आले. लग्नसराई असल्यामुळे मढी मायंबा, वृद्धेश्वर, मोहटादेवी या ठिकाणी नवविवाहीतांची मोठी गर्दी सुरू आहे. त्यामुळे परिसरातील भाविक रहिवासी येथे येणाऱ्या नवदांम्पत्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. मोटरसायकलवरून देवदर्शनासाठी आलेल्या या नवदांम्पच्या पाठीमागेच या नववधुचा प्रियकर सुद्धा मढी येवून पोहचला. नियोजनाप्रमाणे नवरीने नवऱ्याला मोटर सायकल
वाहनतळाच्या एका टोकाला लांब उभी करण्याचे सांगितले. देवाच्या दारात बायकोचा आग्रह न मोडता नवऱ्याने गाडी देवस्थान वाहनतळच्या आतील बाजूस काही आंतरावर नेवूण लावली. गडाच्या पायऱ्या उतरताना नवरा पुढे नवरी मागे अन काही अंतरावर प्रियकर पायऱ्या उतरत होता. त्याच वेळी खाणा खुणी दोघांमध्ये सुरू होती.
नियोजनाप्रमाणे नवरी वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर थांबली. नवरा मोटारसायकल आणण्यासाठी गेला असता त्याच दरम्यान मागून आलेल्या प्रियकराने नववधू असलेल्या आपल्या प्रियसिला स्वताहाच्या मोटरसायकलवर बसून नव्या जोडीदाराला मागे ठेवत नवरीने जुन्या जोडीदारासोबत मढीत धूम ठोकली. दोन
मिनिटांनी गाडी घेऊन आलेला नवरदेव जेथे नवरी उभी होती त्या प्रवेशद्वारा जवळ आला. इकडे तिकडे चोहीकडे नजर फिरवली त्याला आपली नववधू दिसली नाही.
तो कावरा बावरा झाला. घामाने डबडबून गेला. त्याने दुकानदाराकडे चौकशी केली. पण भाविकांच्या वर्दळी पुढे कोणाचे लक्ष नव्हते. नंतर खरा प्रकार लक्षात येताच उपस्थित भाविक भक्तांनी नवरदेवाला धीर दिला. त्यानेनातेवाईकांना फोन लावले. त्यांच्या भाषेत नवरी पळून गेल्याचे सांगितले. नवरदेव व नातेवाईकांनी सीसीटीवी फुटेज बघून चेहरा न दिसणाऱ्या प्रियकराला ओळखले सुदधा परंतू पोलीसात मात्र तकार दाखल झाली नाही मात्र देवदर्शनाला नवऱ्याबरोबर आलेली नववधू प्रियकराबरोबर पळून गेल्याची चर्चा परिसरात
जोरात सुरू आहे. नवरी नगर तालुक्यातील असल्याने नगर तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.
COMMENTS