पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
आपला मुख्यमंत्री करायचाच असा पक्का निर्धार शिवसेनेने केला असून भाजपाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे.

आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन  दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपावर अनेक वार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तडजोड करीत पुन्हा भाजपाशी जुळवून घेतले होते. मात्र, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि राम मंदिराचा मुद्दा यावरुन शिवसेनेची पुन्हा एकदा नाराजी दिसून आली आहे. त्यानंतर आजच्या अग्रलेखात तर थेट शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी पक्क्या निर्धाराने कामाला लागण्याचा संदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post