वेब टीम : पुणे जिल्ह्यात अनेक विवाहांमध्ये वर्हाडी असल्याचे भासवून चोर्या करणार्या नवरा बायकोच्या जोडप्याला पुणे ग्रामीण पोलिसांना प...
वेब टीम : पुणे
जिल्ह्यात अनेक विवाहांमध्ये वर्हाडी असल्याचे भासवून चोर्या करणार्या नवरा बायकोच्या जोडप्याला पुणे ग्रामीण पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. चोरट्या जोडप्यांकडून 92 तोळे सोने आणि स्वीफ्ट कारसह रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केले आहे. विलास मोहन दगडे(वय28) आणि जयश्री विलास दगडे(वय25) अशी अटक झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील लग्नांमध्ये होणार्या चोर्यांचे वाढते प्रमाण बघता विशेष पथक निर्माण करण्यात आले होते. पथकास मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी मंगल कार्यालयात लग्नातील गोंधळाचा आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे जोडपे येणार असल्याचे समजले. त्यानुसार या कार्यालयात पोलिसांनी सापळा लावला होता.
यावेळी स्विफ्ट कारने आलेल्या या दांपत्याची झडती घेतली असताना त्यांच्याकडे चार तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची आणि इतर 17 ठिकाणी केलेल्या चोर्यांची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून 92 तोळे सोने, 10 मोबाईल हँडसेट, स्विफ्ट डिझायर कार असा 37 लाख 27 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जोडप्याने आत्तापर्यंत लोणीकाळभोर येथील मधुबन मंगल कार्यालय, राहू येथील देविका मंगल कार्यालय, राजगड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय, केडगाव चौफुला येथील दत्त मंगल कार्यालय, वाघोली येथील सोयरीक मंगल कार्यालय, उरुळी देवाची येथील स्वराज मंगल कार्यालय, मालेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.
COMMENTS