--> मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम

वेेेब : टीम राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत  ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी जिल्ह्...


वेेेब : टीम
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत  ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी जिल्ह्यात मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेअंतर्गत 1,18,575 सॅनेटरी नॅपकिन पॅकेटचा साठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला असून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छता संवर्धन व्हावे.या उद्देशाने केंद्र शासनाचा मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 10 ते 19 किशोरवयीन मुलींची संख्या आहे.मासिक पाळी सुरू होण्याचे वय 10 ते 16 वर्षांपर्यंत असू शकते .किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक ,मानसिक ,भावनिक, बदल होतात त्यात मासिक पाळी सुरू होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे.त्यात योग्य माहितीच्या अभावी मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यानंतर नैराश्य येणे, उदासीनता येणे,शारीरिक अस्वच्छता व त्या बाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत असलेल्या अज्ञानामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.  ग्रामीण भागामध्ये अज्ञानाच्या कारणाने किशोरवयीन मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसेच या काळात स्वच्छता न ठेवल्याने आजारांनाही सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिनचा  पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
     या धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यात दरमहा ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना  सॅनिटरी नॅपकिन आशा कार्यकर्ती मार्फत माफक दरात  वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील 10 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  तसेच मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काय काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी,या विषयाची जनजागृती ग्रामीण भागांमध्ये आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत केली जाणार आहे.याबाबतचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका यांना देण्यात आलेले आहे.मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला 1,18,575 सॅनिटरी नॅपकीन पॅकेटचा साठा उपलब्ध झालेला आहे.एप्रिल 2019 पासून  प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत माफक दरात सॅनिटरी नॅपकीन वाटप सुरू करण्यात आलेली आहे
जिल्ह्यातील आरोग्य विभागाने केले नियोजन :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाला सॅनेटरी नॅपकीनचा साठा उपलब्ध झालेला असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावनिहाय किशोरवयीन मुलींच्या संख्येनुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वितरित केलेले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोच  केले जाणार आहे यासाठी 10 ते 19 टक्के वयोगटातील किशोरवयीन मुलींची नोंद ग्रामीण भागातील प्रत्येक आशाकडे उपलब्ध राहणार असून प्रत्येक गृहभेटीत याबाबत आशा मार्फत जनजागृती करून माहिती दिली जाणार आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हा उपक्रम अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना राबविण्याचे नियोजन केलेले असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून गाव पातळीवरील किशोरवयीन मुलींपर्यंत ही योजना राबविली जाणार आहे
 शासनाच्या या उपक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुलींना 6 रुपयांना एक सॅनिटरी नॅपकिंग चे पॅकेट अशा माफक दरात सॅनिटरी नॅपकिन वितरित केले जाणार आहेत त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविकेची माध्यमातून गृहभेटी देऊन मासिक पाळीच्या काळात घ्यायच्या काळजीविषयी जनजागृती केली जाणार आहे. मासिक पाळीची शास्त्रीय कारणे, या काळात शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी तसेच काय काळजी घ्यावी.पौष्टिक आहार कोणता घ्यावा याविषयीची माहिती ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींना दिली जाणार आहे:-अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी दिली आहे  .
       तसेच ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींनी मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान माननीय सौ शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर ,माननीय सैा राजश्रीताई घुले उपाध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विश्वजित माने यांनी केलेले आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4279,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2652,Politics,2715,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम
मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम
https://1.bp.blogspot.com/-WxdF639c4Ls/XQ4HSyVVf_I/AAAAAAAAAkE/aVZah7DhbOwNMCodvcAhLdAdUX8aFmmdQCLcBGAs/s1600/WhatsApp%2BImage%2B2019-06-21%2Bat%2B8.02.50%2BPM.jpeg
https://1.bp.blogspot.com/-WxdF639c4Ls/XQ4HSyVVf_I/AAAAAAAAAkE/aVZah7DhbOwNMCodvcAhLdAdUX8aFmmdQCLcBGAs/s72-c/WhatsApp%2BImage%2B2019-06-21%2Bat%2B8.02.50%2BPM.jpeg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/06/RKSK.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/06/RKSK.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content