नगरसेवकांच्या पुढाकारातून प्रभाग १ मध्ये हरित प्रभाग उपक्रमाचा शुभारंभ


वेब टीम : अहमदनगर
महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, मीनाताई चव्हाण, दिपाली बारस्कर यांच्या पुढाकारातून हरित प्रभाग उपक्रम राबविला जात असून त्याचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात प्रभागातील सर्व रस्त्यांच्या कडेला, मोकळे भूखंड, नागरी वसाहतीतील उपलब्ध जागेवर वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. या साठी संपत बारस्कर यांनी स्वखर्चाने सुमारे १० लाख रुपयांची वृक्षांची रोपे आणली आहेत.
प्रभागातील अहिल्यादेवी होळकर चौक, भिस्तबाग महाल रस्ता, आठरे पाटील पब्लिक स्कूल रस्ता, कॉटेज कॉर्नर, वडगाव गुप्ता रोड, तपोवन रोड, ढवण वस्ती, जुना पिंपळगाव रस्ता, डॉन बॉस्को रस्ता, संपूर्ण पाईपलाईन रस्ता, पंचवटी कॉलनी, कादंबरी नगरी, वाणी नगर परिसरात ही वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन केले जाणार आहे. या वृक्षांना पाणी देण्यासाठी खास टँकरही तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आ. संग्राम जगताप, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, नगरसेवक कुमार वाकळे, प्रा. माणिकराव विधाते, शिवाजी चव्हाण, बाळासाहेब बारस्कर, पोपट बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, डॉ.अनिल आठरे, साधना बोरुडे, सचिन ठोसर, रंजना उकिर्डे, स्वप्निल ढवण, संकेत शिंगटे, देविदास बारस्कर, डॉ.संदीप अनभुले, गणेश रोडे, विजय भोसले, माऊली जाधव, सारंग पंधाडे, नितीन बारस्कर, अक्षय पांडे, रावसाहेब बारस्कर यांच्यासह गुरु प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

आमचे कार्यक्रम फोटो सेशनपुरते नसतात : आ. संग्राम जगताप 
वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही काळाची गरज झालेली आहे, त्यामुळे वृक्षारोपण चळवळ ही लोक चळवळ व्हावी, यासाठी आमचे सर्व सहकारी नगरसेवक व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, आमचे हे वृक्षारोपण इतरांसारखे फक्त फोटो सेशन पुरते नसून ते कायम स्वरूपी टिकणारे आहे. हरित नगर करण्याची आमची संकल्पना असून ज्या ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक आहेत ते सर्व नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच, इतर विकास कामे आणि वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करीत आहेत. नगरसेवक संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पथदर्शी ठरेल, असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

प्रभाग १ मधील नगरसेवकांचा उपक्रम पथदर्शी : आयुक्त भालसिंग 
नगर शहरात महापालिकेच्या वतीने २२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. प्रभाग १ मधील नगरसेवकांनी सुरु केलेला उपक्रम पथदर्शी असून शहरातील सर्वच नगरसेवकांनी असा उपक्रम राबविल्यास आणि नागरिकांनीही त्यांना सहकार्य केल्यास संपूर्ण नगर शहर हे हरित शहर झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आयुक्त भालसिंग यांनी व्यक्त केले. 

नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले, प्रभागात आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांबरोबरच सर्व नागरिकांना बरोबर घेवून सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संपूर्ण प्रभाग समस्या मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हरित प्रभाग उपक्रमात प्रभाग १ मध्ये १० फुट उंचीच्या रोपांची लागवड केली जात आहे. त्यांना पाणी देण्यासाठी खास टँकरही उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा उपक्रम नागरिकांच्या सहकार्यातून राबविला जात आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबावर एका वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे हे सर्व वृक्ष जोपासले जाणार असून पुढील वर्षी या वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जाणार असल्याचे संपत बारस्कर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post