नगरमध्ये 'द बर्निंग कार'चा थरार


वेब टीम : अहमदनगर
औरंगााबाहून पुण्याकडे जात असलेल्या बीएमडब्ल्यू कारला नगर येथील डीसपी चौकाजवळ असलेल्या हॉटेल नटराज जवळ भीषण आग लागली. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ चालकास थांबवल्याने कारमधील चौघेजण बालंबाल बचावले. यात पुणे येथील प्रसिध्द डॉ.विलास साबळे व अन्य तिघेजण याकारमधून प्रवास करत होते.


याबाबत सविस्तर असे की, नगरमध्ये एसटी व ट्रकचा अपघात होवून संपूर्ण एसटीबस जळून खाक झाली. या घटनेत एसटीबसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले होते.त्यापाठोपाठ शनिवारी दुपारी स्टेशन रोडवर पुण्याहून पैठणकडे जाणाऱ्या एसटीबसला देखील आग लागली होती. नागरिकांसह चालक व वाहकाच्या प्रसंगावनामुळे तात्काळ बस थांबवून ही आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. अशीच घटना इमामपूर घाटात देखील घडली.या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनंतर रविवारी रात्री १०वाजण्याच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार नगरकरांनी पाहीला. मात्र वेळीच कार थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली.


भोसरी येथील डॉ.विलास साबळे व अन्य तिघेजन असे चौघेजण औरंगाबादहून पुण्याकडे रविवारी रात्री जात होते. त्यांची कार नगरमधील डीएसपी चौक पास करून नटराज हॉटेल जवळ आली असता. कारच्या समोरील भागातून धूर येत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी पाहीले. त्यांनी तात्काळ कारला आडवे होत. चालकास कार रस्त्याच्या बाजूला घेण्याचे सूचवले. चालकाने कार थांबवून नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सर्वजण कारमधून बाहेर पडले आणि काही क्षणातच संपूर्ण कारने पेट घेतला. याबाबत महापालिकेच्या अग्निशमन पथकास कळवल्याने या पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates