नगरच्या प्रश्नांसाठी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट : शिवसेना उपनेते अनिल राठोड


वेब टीम : अहमदनगर
नगर शहरासाठी मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना कामे अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत. ती तात्काळ मार्गी लावावी या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील राऊत यांची भेट घेऊन चर्चाा केली. दरम्यान या संदर्भामध्ये उर्वरित कामांचा निधी आणण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर शहरांमध्ये दहा कोटी रुपयांची कामे करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. ती कामे अद्यापही होऊ शकले नाही. ती व्हावी याकरता आज शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक राम नळकांडे, नगरसेवक दत्ता कावरे, उदय अनभुले यांनी आज कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.

कार्यकारी अभियंता राऊत यांनी आम्ही या संदर्भामध्ये महानगरपालिकेला दोन वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणताही पत्रव्यवहार आमच्याकडे प्राप्त झालेला नाही. दहा कोटी रुपयांची कामे आहे ते आता साडेबारा कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे आपल्याला अडीच कोटी रुपयांचा निधी कमी पडत आहे. त्यामुळे कामे कशी करायची याबद्दल महानगरपालिकेने सांगणे क्रमप्राप्त आहे. मात्र दोन वेळेला यासंदर्भात आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ ही कामे करता येतील, असेही कार्यकारी अभियंता यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

या चर्चेच्या वेळी बाळासाहेब बोराटे म्हणाले की, शहरातील महत्त्वाचे रस्ते यामध्ये घेण्यात आलेले आहे. अद्यापही निविदा प्रक्रिया न झाल्यामुळे ती कामे केव्हा होणार असा प्रश्न आहे. तात्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली मात्र वरील अडीच कोटी रुपयांचा निधी हा आल्यावरच पुढची प्रक्रिया राबवली जाईल असे प्रशासनाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, यांनी मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दहा कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करायचे आहे, ती कामे अद्यापही न झाल्यामुळे आम्ही आज कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली असून त्यांना या सर्व परिस्थितीत माहिती दिलेली आहे मात्र अडीच कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्याकरता आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी करून विषय मार्गी लावनार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, तसेच शहरातील पोलीस हेडकॉटर मधील गटारांची झालेली दुरवस्था पाहता तेसुद्धा दुरुस्ती करण्या संदर्भात मागणी केलेली आहे कार्यकारी अभियंता यांनी यासंदर्भातली दुरुस्ती निश्चितपणे केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी वास्तविक फाटा शहरातील महत्त्वाचे रस्ते यामध्ये घेण्यात आलेले आहे ते पूर्ण तुला जावे अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही गेल्या काही दिवसांपासून या संदर्भामध्ये पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले जो अतिरिक्त निधी आहे तो आणण्यासाठी आम्हीसुद्धा आता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post