--> राष्ट्रवादीचे आमदार जगताप भाजपाचे माजी खासदार गांधींच्या घरी | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

राष्ट्रवादीचे आमदार जगताप भाजपाचे माजी खासदार गांधींच्या घरी

वेब टीम : अहमदनगर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने नगरच्या राजकारणात भयाण शांतता आहे. असे असतानाच ...


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने नगरच्या राजकारणात भयाण शांतता आहे. असे असतानाच त्यांनी आज रात्री माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धाव घेत भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे नगर शहराचे राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत असल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार गांधी- आमदार जगताप यांच्या एकत्रित चर्चेच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून पक्षातील कार्यक्रमांपासून अलिप्त आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकांनाही जात नाहीत. दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाल्याने स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला धाव घेत मंत्री शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जगताप मंत्री शिंदे यांना भेटलेच नाहीत असे सांगितले आहे. तसेच आमदार जगताप यांनीही शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

जगताप शिवसेनेत जाणार! ही चर्चा शांत होत नाही तोच
आज नगर मुक्कामी असलेल्या राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा व भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या भेटीसाठी आ. संग्राम जगताप हे माजी खासदार यांच्या निवासस्थानी आज रात्री दहा वाजता दाखल झाले. त्यांनी महिला आघाडीच्या अध्यक्षांचा यथोचित सत्कारही केला. यावेळी माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी, उपमहापौर मालनताई ढोणे उपस्थित होत्या. अध्यक्षा रहाटकर, माजी खासदार गांधी, आ. जगताप यांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: राष्ट्रवादीचे आमदार जगताप भाजपाचे माजी खासदार गांधींच्या घरी
राष्ट्रवादीचे आमदार जगताप भाजपाचे माजी खासदार गांधींच्या घरी
https://1.bp.blogspot.com/-PUjb7E2sWsU/XS9pWPwMSbI/AAAAAAAAB5Q/zKystZ7egrseXr76Xu0O5N3TgQNiYn0cwCLcBGAs/s320/IMG-20190717-WA0056.jpg
https://1.bp.blogspot.com/-PUjb7E2sWsU/XS9pWPwMSbI/AAAAAAAAB5Q/zKystZ7egrseXr76Xu0O5N3TgQNiYn0cwCLcBGAs/s72-c/IMG-20190717-WA0056.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/07/Dilip-gandhi-sangram-jagtap.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/07/Dilip-gandhi-sangram-jagtap.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content