फोटोग्राफी प्रशिक्षक म्हणून समीर मन्यार यांची नियुक्ती


वेब टीम : अहमदनगर
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे फोटोग्राफी प्रशिक्षक म्हणून समीर मन्यार व ब्युटी पार्लर प्रशिक्षक म्हणून जयश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतेच सातारा येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे भारत सरकार ग्रामीण मंत्रालयाच्याा वतीने बंगलोर येथील रुटसेटी राष्ट्रीय अकादमीच्या वतीने सातारा येथईल आयडीबीआय ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्रातील फोटोग्राफर, ब्युटी पार्लर, टेलरिंग, सेलोफोन रिपेअरिंग यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातून 40 ते 50 फोटोग्राफी व ब्युटी पार्लरसाठी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

दोन दिवसीय प्रशिक्षणानंतर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. नगर जिल्ह्यात फोटोग्राफी प्रशिक्षण देण्यासाठी समीर मन्यार व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी जयश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी कोर्स को-ऑडिनेटर राघवेंद्र देसाई, प्रशिक्षक एन. आर. मूर्ती, नाबार्डचे बीडीएम सुबोध अभ्यंकर, संचालक अजिंक्य पवार यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. याबद्दल सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेचे नगर येथील संचालक प्रदीपकुमार सिन्हा, सौ. सविता शिंदे, कांता दुधाट, स्वाती थोरात यांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post