कर्नाटकचे बंडखोर आमदार श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईदरबारी दाखल


वेब टीम : शिर्डी
कर्नाटक तील बंडखोर आमदार श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईदरबारी दाखल झाले आहेेेेत. सर्व बंडखोर आमदार दाखल होताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाा आहे. यांच्या बरोबर भाजपाचे शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या सह अन्य भाजप पदाधिकारी होते.
जनता दल (एस) व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत त्यांना अपात्र ठरवण्यासंबंधी मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला चार दिवसांचा दिलासा मिळाला आहे. कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून विरोधकांना चकित केले आहे. बंडखोर आमदारांपैकी दहा आमदारांच्या विधानसभा अध्यक्षांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एकत्रित सुनावणी झाली. त्यानंतर बंडखोर आमदार मुंबईहून आज शिर्डीमध्ये साई दर्शनाला दाखल झाले.सत्तेचा पेच मिटावा, यासाठी त्यांनी आज साई दर्शन घेतले.
यावेळी दर्शनासाठी कडेकोट बंदोबस्तात शिर्डीत आले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान या बंडखोर आमदारांना शिर्डीत खाजगी वाहनाने नेण्यात आले. विमानतळावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे दाखवून निदर्शने करीत भाजपा सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.
प्रथम खाजगी विमानाने सुरक्षा यंत्रणेचे आगमन झाल्यानंतर जेट स्पाईस कंपणीच्या विमानाने १२ वाजून ५४ मिनीटांनी आगमन झाले.
यानंतर सर्व आमदार यांना शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी कडेकोट बंदोबस्तात शिर्डीत नेण्यात आले. साईं समाधीचे दश॔न घेतले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates