'केसात गजरा अन गावभर नजरा' ; शिवसैनिकांची छगन भुजबळांच्या विरोधात पोस्टरबाजी


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे. शिवसेना प्रवेश या अफवा असल्याचं छगन भुजबळांनी आधीच स्पष्ट केलं.

सचिन अहिरांनंतर छगन भुजबळही शिवसेनेत येणार असल्याची बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या आधारावरच शिवसैनिकांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. विक्रोळी येथील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी शिवसेना भवन समोर, मातोश्री समोर तसेच मुंबईच्या सर्वच प्रमुख चौकात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर लावले आहेत.

बॅनरवर छगन भुजबळ यांचे एक कार्टून असून त्यांना लखोबा लोखंडे संबोधले आहे. साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही, आपण आहे तिथेच राहा, असा संदेश या बॅनरवर देण्यात आला आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंगवर शिवसैनिकांची नाराजी दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post