माकप कार्यकर्त्याची हत्या, भाजप- आरएसएसच्या 9 जणांना जन्मठेप


वेब टीम : कन्नूर
माकप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 कार्यकर्त्यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. कन्नूर तुरुंगात 6 एप्रिल 2004 मध्ये माकप कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्या हत्या करण्यात आली होती.

केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या के. पी. रवींद्रन यांचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी 31जणांवर आरोप झाले होते. तब्बल 15 नंतर आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. न्यायालयानं याप्रकरणी 9 जणांचा हत्येत सहभाग असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post