राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शेवगावच्या विद्यार्थ्यांचे यश


वेब टीम : अहमदनगर

दिव्यांजली अनपटचे नेत्रदीपक यश, चार मिनिटात सोडवले 100 गणिते,  शुभांगी लवांडे 'बेस्ट ट्रेनर'
अवघ्या चार मिनिटांमध्ये 100 गणिते सोडवून राष्ट्रीय अबँकस स्पर्धेत शेवगाव येथील दिव्यांजली अनपट हिने तिसरे स्थान पटकावले.

गुरू अबँकस च्या वतीने वाघोली (पुणे) येथे नुकतेच आयोजित स्पर्धेत 5 ते 14 वर्ष वयोगटातील 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी शेवगाव शाखेच्या शुभांगी लवांडे यांना 'बेस्ट ट्रेनर ऑफ दि इअर 2019' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेवगाव येथील गुरू अबँकस अकॅडमीद्वारे दिव्यांजली अनपट, स्नेहल लवांडे, सृष्टी मुंगसे, विवेक चव्हाण, ज्ञानेश्वरी झिरपे, अनुष्का फलके, स्पदन झिरपे, हर्षदा सातपुते, अविनिश गोसावी, संतोषी वाघ, गौरी वाकडे, वेदांती फलके, सई पायघन, हर्षवर्धन निकम या 14 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

वेदांती फलके या चार वर्षीय मुलीने चार मिनिटात 100 गणिते सोडवून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पहिल्या लेव्हलमध्ये अविनाश गोसावी, स्पदन झिरपे, गौरी वाकडे, हर्षदा सातपुते, संतोषी वाघ यांना तर दुसऱ्या लेव्हल साठी दिव्यांजली अनपट, स्नेहल लवांडे यांनी पारितोषिक पटकावले.

यावेळी गुरू अबँकस कंपनीचे डायरेकटर महेंद्र गिरी व शुभांगी गिरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post