मुफ्ती, अब्दुल्ला, नेहरु परिवाराने भ्रष्टाचार केला : अमित शहा


वेब टीम : दिल्ली
कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरमध्ये भ्रष्टाचार वाढला. ‘तीन’ परिवारांनी काश्मीरमध्ये भ्रष्टाचार केला, असा आरोप करत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मुफ्ती, अब्दुल्ला, नेहरु परिवारावर निशाणा साधला.

राज्यसभेत कलम ३७० वरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. शहा यांनी, विरोधकांनी फक्त व्होटबँकचे राजकारण करू नये, काश्मीरच्या विकासात्मक भूमिकेत सहभाग घ्यावा, असे म्हटले.


कलम ३७० रद्द करण्याबाबत राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अमित शहा यांनी परखड मते मांडली. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये उद्योगांअभावी बेरोजगारी वाढली आहे. कलम ३७० गरीबी, दलित, आदीवासी विरोधी आहे. या कलमामुळे काश्मीरचा युवक भारतापासून दूर राहिला.

आम्ही धर्माचे राजकारण करत नाही. उद्योगांअभावी जम्मू-काश्मीरच्या युवकांचे, महिलांचे, मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

कलम ३७० हे दहशतवादाला पूरक आहे. कलम  ३७० हटवले गेले नाही तर, जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी कारवायांना आळा घालता येणार नाही. हे कलम हटवल्याने आता लष्काराला दहशतवादाचा जोरदार मुकाबला करण्यास बळ मिळणार आहे. काश्मीरच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांना यावे लागले. आता नव्या युगाचा उदय झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates