महाराष्ट्रातील ९ स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतीदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान


वेब टीम : मुंबई
‘भारत छोडोआंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती’ आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 9 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी क्रांति दिनी राष्ट्रपती भवनात सन्मान होणार आहे.

9 ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून ‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्ती संग्राम’, यासोबतच देशभरात ब्रिटीशांना हाकलून लावण्यासाठी झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी राष्ट्रपती भवनात सन्मान सोहळा आयोजित  करण्यात येतो.
     
शुक्रवारी सन्मान होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील भिवाजी अंबुले,  नागपूर जिल्ह्यातील रतनचंद जैन, परभणी जिल्ह्यातील माधवराव कुलकर्णी, बुलडाणा जिल्ह्यातील नारायण खेळकर, कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तात्रय मोरे, औरंगाबाद जिल्ह्यातील लक्ष्मण उखडे, लातूर जिल्ह्यातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मडगे, वर्धा जिल्ह्यातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्ह्यातील बन्सी जाधव या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post