वेब टीम : पुणे सांगली कोल्हापुर भागात बांधकामांमुळे नाहीतर अलमाटी धरणाची उंची आणि २००५ मध्ये ठरलेली पूररेषा जबाबदार आहे. यावेळी काँग्...
वेब टीम : पुणे
सांगली कोल्हापुर भागात बांधकामांमुळे नाहीतर अलमाटी धरणाची उंची आणि २००५ मध्ये ठरलेली पूररेषा जबाबदार आहे.
यावेळी काँग्रेसची सत्ता सर्वत्र होती. त्यामुळे याला जबाबदार काँग्रेस असल्याचा आरोप पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पंचगंगेची पुररेषा मुख्यमंत्र्याकडुन बदलण्यात आली असल्याचा आरोप करण्यात?आला आहे. ही पुररेषा २००५ च्या पूरावर ठरली.२००५ च्या आधी किंवा नंतर कोल्हापूर महापालिकेत कधीच भाजपची सत्ता नव्हती. त्यामुळे पूररेषेंतर्गत नियमात छेडछाड करून बांधकामांना परवानगी काँग्रेसने दिली असा आरोप यावेळी पाटील यांनी केला.
गेली अनेक वर्षापासून शहराजवळची गावे पालिकेची हद्द वाढविण्यास विरोध करत आहेत. त्यातच पूररेषेमुळे ४० हजार हेक्टर क्षेत्र विकासापासून दूर रहात आहेे. दुसरीकडे पूररेषा निश्चित केल्यापासून म्हणजे २००५ पासून शहरात पूर आलेला नाही.
त्यामुळे २००५ च्या पूररेषेचा पूनर्विचार करून बांधकामांना परवानगी देण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच आलेल्या पूरामुळे याचा फेरविचार केला जाईल. दरम्यान, पूररेषेत बांधकामे केल्याने नव्हे, तर धरणांचे नियोजन चुकल्याने पूर परिस्थीती निर्माण झाली, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
दरवर्षीच्या तुलनेत तीन पट पाऊस पडल्याने ही परिस्थीती निर्माण झाली. आलेला पूर लक्षात घेऊन भविष्यात यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता विचारात घेऊन नियोजन केले जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.