छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन


वेब टीम : अहमदनगर
शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्यातील चारा छावण्या 31 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहेत. सोशल मीडियावर पसरविण्यात येणार्‍या छावण्या बंद करण्याच्या अफवांवर शेतकर्‍यांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

पाथर्डी, जामखेड तालुक्यातील चारा छावण्या बंद करण्याचे तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी सोशल मीडियावर तसेच तोंडी आदेश चारा छावणी चालकांना दिल्याने, छावणी चालकाने चारा छावण्या बंद केल्या.

त्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी द्विवेदी यांची भेट घेवून चारा छावण्या पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

आ. कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे विहिरींना, बोरवेल तसेच छोटी मोठी तळे कोरडीच आहेत. हे प्रशासनाने पहावे व शहानीशा करावी. रस्त्याच्या कडेला हिरीगार गवते पाहून छावण्या बंद करू नये.

जिल्ह्यातील धरणे भरली असली तरी तालुक्यातील गावांची वस्तूस्थीती वेगळी आहे. त्यामुळे मुबलक चारा व पाणी उपलब्ध होई पर्यंत चारा छावण्या सुरु ठेवा असे ही जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावेळी पाथर्डी, जामखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates