कार चालकास अडवून मारहाण करून लुटले


वेब टीम : अहमदनगर
नगर-पुणे रोडने शिरूरकडे जाणार्‍या कार चालकास गाडी आडवी घालून 10 ते 15 जणांच्या जमावाने खोर्‍याचे दांडके, स्टंपने मारहाण करून त्याच्याकडील 50 हजार रूपये व इतर साहित्य बळजबरीने लुटून नेल्याची घटना वाडेगव्हाण शिवारात बुधवारी (दि.14) रात्री 10 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अविनाश सुभाष ढोरमले (वय 37, रा. जातेगाव, पारनेर) हे त्यांच्या मित्राची फोर्ड इको स्पोर्टस् (क्र. एम एच 12 के. जे. 5600) कारने शिरूरकडे जात असताना वाडेगव्हाण गावाच्या पुढे नितीन पांडुरंग शेळके, किशोर यादव, अजय शेळके, विजय शेळके, गणेश कोहकडे, गोरख मोटे, राहुल यादव (पुर्ण नाव माहित नाही, सर्व रा. यादववाडी पारनेर), अक्षय कचरे, संदीप चौधरी, संजय पांडुरंग शेळके, व इतर 5 ते 6 अनोळखी (सर्व रा. ता. पारनेर) यांनी ढोरमले यांच्या कारला विना नंबरच्या गाड्या आडव्या घातल्या (एक इस्टॉस व एक स्वीफ्ट) आणि ढोरमले यांना खोर्‍याचे दांडके व स्टंपने उजव्या खांद्यावर, डोक्यात मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, घड्याळ व एक अंगठी व 50 हजार रूपये रोख असा ऐवज बळजबरीने चोरून घेतला व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सुपा पोलिसांनी अविनाश ढोरमले यांच्या फिर्यादीवरून भादंविक 143, 147, 148, 149, 324, 395, 504, 506, 341, 427, मुंबई पोलिस कायदा कलम 37(1) (3)135 प्रमाणे दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post