नगर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्साहात


वेब टीम : अहमदनगर
नगर जिल्ह्यात शहरासह ठिकठिकाणी बालगोपाळासह नवतरुणांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली.


नगर शहरात केडगाव, भिंगार, एमआयडीसी व सावेडी उपनगरात चौकाचौकात तसेच बु-हाणनगर, नागरदेवळे येथे बालगोपाळांनी व युवक तरुण मंडळाच्या कार्यकर्ते यांनी उंच उंच दहिहांडी बांधल्या होत्या.

यामुळेच दहिहांडी फोडणे अनेक कार्यकत्यांना अवघड झाले होते. काही मंडळांच्या कार्यक्रमास सिनेअभिनेत्री आल्या असल्याने तेथील दहिहांडीस मोठी गर्दी पाहण्यासाठी उपस्थित होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post