वेब टीम : मुंबई ‘एकेकाळी ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनाच पक्षात प्रवेश देणे ही चांगली कल्पना नाही.’ अशी प्रतिक...
वेब टीम : मुंबई
‘एकेकाळी ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनाच पक्षात प्रवेश देणे ही चांगली कल्पना नाही.’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांत पक्षात झालेल्या मेगाभरतीवर दिली.
‘पार्टी विथ डिफरन्स या भाजपच्या प्रतिमेला तडा जाऊ नये.’ अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भाजपचे सरकार आहे त्यामुळे बरेच लोक पक्षात सामील होत आहेत’ असे विधान केले होते. त्याला सहमती देत खडसे म्हणाले ‘जे लोक स्वार्थाच्या हेतूने पक्षात सामील होतील ते सत्तेबाहेर गेल्यावर त्याचा त्याग करतील.
पक्षाच्या विस्तारासाठी चांगल्या लोकांचा समावेश करणे गरजेचे आहेच परंतु ज्या लोकांविरुद्ध आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते अशा लोकांचा समावेश करणे हानिकारक ठरेल.’
विधानसभा निवडणुकीविषयी विचारले असता, ‘पक्षाने तिकीट दिल्यास मुक्ताईनगर मतदारसंघातून मी निवडणूक लढवेल’ असेही त्यांनी सांगितले.