विधानसभेत पॉर्न पाहणारा भाजपचा पराभूत आमदार झाला उपमुख्यमंत्री


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्रीमंडळामध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण सावादी यांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. २०१२ मध्ये लक्ष्मण सावादी यांना इतर दोन आमदारांसहीत कर्नाटक विधानसभेत पॉर्न पाहताना पकडले होते.

असे असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही लक्ष्मण यांच्या खांद्यावर थेट इतकी मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

वादग्रस्त पार्श्वभूमी असणाऱ्या सावदी यांना इतके महत्वाचे पद देण्याच्या येडीयुरप्पा यांच्या निर्णयावर पक्षातील काही वरिष्ठ नेतेच नाराज झाले. येडियुरप्पा यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

कर्नाटकात २०१२ मध्ये भाजपचे सरकार असताना तत्कालिन मंत्री आणि भाजप आमदार लक्ष्मण सावादी विधानसभेचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहत होते.

त्यावेळी तत्कालिन पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमर आणि महिला-बाल विकासमंत्री सी. सी. पाटीलही सावदी यांच्या फोनमध्ये पॉर्न पाहताना कॅमेरांनी टिपले गेले होते.

विधानसभेत त्यावेळी दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा सुरु होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले.

या घटनेवरुन राज्यात मोठा गदारोळही झाला होता. वृत्तवाहिन्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडिओ दाखवले त्यावेळी सावादी यांनी हास्यास्पद स्पष्टीकरण दिले. याच मुद्द्यावरुन तीन आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post