डोक्यात दगड टाकून खून, तीन तासात आरोपी गजाआड


वेब टीम : अहमदनगर
शेवगाव येथे झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात तीन आरोपींना गजाआड केले आहे. कृष्णासिंग पूनमसिंग भोंडा (वय २२), परमेश्वर पुनमसिंग भोंडा (वय १९) व लक्ष्मण कांबळे (वय ३० सर्व रा.रामनगर, शेवगाव) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आठ ऑगस्टला सकाळी सात वाजता पाथडी रोडवरील आयटीआय समोरील मोकळ्या जागेतील गवतात एक प्रेत आढळून आले होते घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून मयत बापूसाहेब एकनाथ घनवट वय 37 म्हसोबा नगर शेवगाव यांच्या डोक्यावर व तोंडावर जबर दुखापत करून खून केल्याचे उघड झाले या घटनेच्या तपासासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे तीन पथके तयार करण्यात आली.

घटनास्थळाच्या जवळ राहत असलेल्या महिलेशी असणाऱ्या अनैतिक संबंधातून सदर इसमाचा खून झाला असावा असा संशय आल्याने महिलेस ताब्यात घेतली तिची कसून चौकशी केली असता रात्री साडेदहा वाजता सुमारास कृष्णासिंग भोंडा, परमेश्वर भोंडा व लक्ष्मण कांबळे यांनी मयत घनवट यांना मारहाण केली अशी माहिती मिळाली.

महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास करून तिने आरोपींचा शेवगाव परिसरात शोध घेऊन त्यांना पकडण्यात आले मयत घनवट यास लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याच्या अंगावर गवत टाकून प्रेत लपवण्याची आरोपींनी कबुली दिली.

जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू , अप्पर पोलीस प्रमुख सागर पाटील,  शेवगाव उपविभागीय  अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामराव ढिकले सपोनि सुजित ठाकरे, पोउनि भरत काळे, सोपान गोरे, पोना. राजू चव्हाण, राजेंद्र केदार, प्रवीण बागुल, वासुदेव डमाळे, राजेंद्र नागरगोजे, संदीप दरावडे, सोमनाथ सोनटक्के, किशोर शिरसाठ, अभय लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल ढाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post