रोहित पवारांनी आम्हाला टाळले; कर्जत - जामखेडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी


वेब टीम : अहमदनगर
आम्ही कार्यकर्त्यांच्या ओळखी करून दिल्या, नावे दिली, फोन नंबर दिले. मात्र रोहित पवारांनी आमच्या तालुक्यात, जिल्हा परिषद गटात येऊन आम्हाला टाळून कार्यकर्ता मेळावे घेतले याचे दुःख झाले, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांचे पती राजेंद्र गुंड यांनी नाराजी व्यक्त केली.

गुंड यांचे मतदारसंघात मोठे प्रस्थ असल्याने रोहित पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत दुफळी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

याच मतदारसंघातून मंजुषा गुंड यांनी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडूनच तिकिटांची मागणी केली आहे. विविध कार्यक्रम घेत कर्जत -जामखेडमध्ये जम बसविण्याच्या तयारीत असलेल्या रोहित पवारांना यानिमित्ताने पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले आहे.

आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने तालुक्यातील काही नेत्यांना पोटशूळ उठला. मात्र आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते असून लुडबुड करणारे नाहीत. उमेदवारीसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहोत. असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड यांनी दिला.

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे राजेंद्र गुंड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मुबारक मोगल होते. प्रास्ताविकात गुंड यांनी पालकमंत्र्यांना चारीमुंड्या चीतपट करणारा गट असल्याचे सांगत ४० वर्षांच्या राजकीय अनुभवाने विधानसभा निवडणूक निश्चितच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post