प्राध्यापकांनी दिला स्वातंत्र्यदिनी आत्मदहणाचा इशारा


वेब टीम : अहमदनगर
मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करणार महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समिती अहमदनगर यांनी दिला आहे.

विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय याला अनुदान मिळणे साठी आज जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन  करण्यात आले. गेल्या वीस वर्षापासून या शिक्षकांना कोणत्याही पद्धतीचा अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आले नाही.

 वारंवार शिक्षणाधिकारी व शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आल्यानंतर ही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून आज रोजी शिक्षण अधिकारी यांच्या दालनांमध्ये शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या निवेदनाच्या वेळी पालवे सचिन, उमदेवी शेळके, मीना गोरडे, संजय शेवाळे, शीतल निमसे, नानासाहेब बांदल, नितीन साळवे, सावन गतकल, श्रीकांत जाधव, प्रमोद घोडेचोर, भागवत गुंजाळ, बाळासाहेब साळवे, नितीन बुरडे, दिलीप भास्कर गायकवाड, शेखर अंधारे, हरवणे देवीदास, सुभाष  चिंघे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post