पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित


वेब टीम : पुणे
राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केली.

पुणे येथे बोलताना श्री.पवार म्हणाले,राज्यातील पूरपरिस्थिती गंभीर आहे.अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबद कर्नाटक सरकार महाराष्ट्राला सहकार्य करण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासन मदत कार्यात कमी पडत असेल तर केंद्राने तातडीने मदत करावी.जमिनीची माती वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.पूरग्रस्त शेतकऱ्यांची 100 टक्के कर्ज माफी करावी अशी मागणी ही श्री पवार यांनी केली.

राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत…
राष्ट्रवादी चे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रसतांसाठी देणार.50 लाखांचा पहिला धनादेश सोमवारी देणार असे ही शरद पवार यांनी जाहीर केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post