ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी खेळाडूंना 50 लाख


वेब टीम : पुणे
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार यांच्या उपस्थितीत पुण्याच्या बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा नुकताच गौरव करण्यात आला.

यावेळी शेलार यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.


महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत आणि तिरंदाज प्रवीण जाधव या दोनच खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट कन्फर्म केले आहे.

राहीने पिस्टल नेमबाजीत, तर प्रवीणने सांघिक तिरंदाजीत पात्रता निकष गाठला आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये या मराठमोळ्या खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे.

24 जुलै 2020 ते 9 ऑगस्ट 2020 दरम्यान जपानची राजधानी टोकियो या शहरात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post