वेब टीम : बेंगळुरू चांद्रयान २ मोहीमेसंदर्भात मोठी आणि महत्वाची माहिती मिळत आहे. संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑ...
वेब टीम : बेंगळुरू
चांद्रयान २ मोहीमेसंदर्भात मोठी आणि महत्वाची माहिती मिळत आहे. संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही काढली आहेत,अशी माहिती इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी नुकतीच दिली.
अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटरवर जाऊन थांबली आहे. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे.
पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोकडून ऑर्बिटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. ऑर्बिटरने विक्रम लँडरची छायाचित्रे पाठवली आहेत.
त्यावरुन लँडरचं स्थान कळालं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सीवन यांनी एएनआयला दिली आहे. मात्र अद्याप लँडरशी कोणताही संपर्क झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS