वेब टीम : अहमदनगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान ...
वेब टीम : अहमदनगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान एका तरुणीचा उद्रेक झाला.
तिने ‘सीएम गो बॅक’च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे. शर्मिला येवले असे या तरुणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते.
सरकारचं महापोर्टल बंद करावं, पिचडांना उमेदवारी देऊ नये, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी करत अकोले येथे शर्मिली येवले या तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मुख्यमंत्र्यांचा मुख्य ताफा येण्याच्या अगोदर पुढे असलेल्या वाहनावर तिने निळी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ताफा निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अकोले येथे सभेच्या ठिकाणी दाखल झाला.
पोलिसांनी अद्याप संबंधित तरुणीवर कोणतीही कारवाई केली नाही. तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती.
COMMENTS