जागेच्या कारणावरून दगडाने ठेचले ; पत्नीचे ओढले केस


वेब टीम : अहमदनगर
वडिलोपार्जित जागेवरून एकास दगडाने ठेचून गंभीर दुखापत केली. भुतकरवाडी येथील मारुती मंदिराजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमोल अशोक भगत, योगिता अमोल भगत, अशोक लक्ष्मण भगत, निकेश अशोक भगत (सर्व रा. भुतकरवाडी, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बाळासाहेब बबन भगत हे जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब भगत व अमोल भगत यांच्यात वडिलोपार्जित जागेवरून वाद सुरू आहे.

या वादातून काल सकाळी बाळासाहेब भगत व त्यांची पत्नी प्रतिमा हे दोघे घरी असताना चार जणांच्या टोळक्याने शिवीगाळ, दमदाटी करून त्यांना विटा व दगड फेकून मारले.

मारहाणीत बाळासाहेब भगत हे जखमी झाले. तसेच त्यांच्या पत्नीचे केस ओढून मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बाळासाहेब भगत यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दीपक जाधव हे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post