वेब टीम : न्यूयॉर्क सोशल मीडिया आणि फेसबुक हे दोन्ही शब्द आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. सध्या फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून ...
वेब टीम : न्यूयॉर्क
सोशल मीडिया आणि फेसबुक हे दोन्ही शब्द आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. सध्या फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून अधिक युजर्स आहेत.
फेसबुकची विशेष बाब अशी की,फेसबुकची सर्व सेवा यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळते.पण,कदाचित यापुढे फेसबुक आपल्या युजर्सकडून मेंबरशीप फी आकारण्याची शक्यता आहे.
फेसबुकच्या मुख्य पेजवर साइन अपचा पर्याय असतो. खाते उघडायचे असेल तर येथे साइनअप करावे लागते.साइन अपच्या खाली काही दिवसांपूर्वी ‘It’s Free and always will be’ अशी टॅगलाइन दिसायची.
मात्र आता ती बदलून जुनी टॅगलाइन बदलून ती ‘It’s quick and easy’ अशी केली आहे.वेबॅक मशीनच्या माहितीनुसार, फेसबुकने ही टॅगलाइन ७ ऑगस्टच्या आसपास बदलली.
युजर्ससाठी मोफत असूनही फेसबुक जाहिरातींच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहे. फेसबुक युजर्सना फ्रेंड्स आणि फॅमिलीशी कनेक्ट होण्याचा पर्याय देते.
पण बदल्यात ते युजर्सची वैयक्तिक माहितीही गोळा करते.या डेटा अन्य कंपन्यांशी शेअर करते,जेणेकरून कंपनी ध्येय युजर्सना जाहिरात दाखवून व्यवसाय वाढवू शकेल.
COMMENTS