किरण काळे विधानसभेच्या तयारीत ; “जनसंवाद अभियान” ची घोषणा


वेब टीम : अहमदनगर
 नगर शहरातून आगामी विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या किरण काळे यांनी “जनसंवाद अभियानाची” घोषणा केली आहे.

 राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणाऱ्या काळे यांनी शहरातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर दावा केला असून त्यांनी आता प्रत्यक्ष मैदानात उडी मारली आहे.

लवकरच या अभियानाला काळे सुरुवात करणार आहेत. शहरातील सर्व प्रभागांमध्ये ते या अभियानाच्या माध्यमातून जाणार आहेत. मतदारांशी संवाद साधून शहर विकासा बाबत त्यांच्या सूचना जाणून घेणार आहेत. तसेच आपली राजकीय भूमिका आणि विकासाचे व्हिजन मतदारांसमोर मांडणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

काळे यांची नगर विकास मंचाच्या निमंत्रक पदी निवड झाली आहे. नगर विकास मंचाच्या माध्यमातूनच या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आपण शहरातील महिला, युवा वर्ग, नोकरदार, व्यापारी, डॉक्टर, वकील, उद्योजक, क्रीडा, जेष्ठ नागरिक, इतर दुर्बल घटक आदी विविध घटकांशी संवाद साधणार आहोत. या अभियानातून आपण मतदारांच्या सूचनांचा समवेश असणारा सर्वसमावेशक असा निवडणूक जाहीरनामा तयार करणार असून तो निवडणुकीत मतदारांसमोर मांडणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले आहे.

मी उमेदवारीची घोषणा केल्या पासून शहरातील विविध घटकांचे लोक आपल्याला भेटत असून अभूतपूर्व असा प्रतिसाद नगरकर मतदार देत आहेत. लोकांच्या माझ्याकडून असेल्याला अपेक्षा वाढल्या आहेत.

लोकांच्या आग्रहास्तवच आपण ही निवडणूक लढविणार असून गेली अनेक वर्ष नगरकर वाट पाहत असलेला सक्षम तिसरा पर्याय माझ्या निमित्ताने उपलब्ध झाल्याची भावना मतदारांच्या मनात आहे.

सक्षम तिसरा पर्याय मतदारांसमोर नसल्यामुळे “वीट मऊ की दगड मऊ” अशी नगरकरांची मनस्थिती झाली होती. किरण काळे यांच्या सारख्या सामान्य कुटुंबातील पण विकासाचे व्हिजन असलेल्या सुशिक्षित युवा नेतृत्वाने निवडणुकीच्या रिंगणात थेट उडी मारल्यामुळे आता नगरकरांना पारंपारिक पर्यायांव्यतिरिक्त तिसरा पर्याय काळे यांच्या रूपाने मिळाला असल्याची चर्चा शहरात झडू लागली आहे.

योग्य टप्प्यावर नगरकरच ही निवडणूक आपल्या हातात घेवून शहर विकासासाठीच हे ऐतिहासिक जनआंदोलन हाती घेतील आणि नाकर्त्या राजकारण्यांना कायमचे घरी पाठवतील, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post