नगर जिल्ह्यातील तिघांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई


वेब टीम : अहमदनगर
गुन्हेगारी पाश्वभूमी असणाऱ्या नगर जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

वाळू तस्करी,  धोकादायक व्यक्ती, अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्यावर व कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस प्रमुखांंनी दिले होते.

त्यानुसार व्यक्ती व वाळूतस्कर महेंद्र बाजीराव महारनोर (वय २६, रा.डोमाळवाडी, वांगदरी, ता. श्रीगोंदा), अजय ऊर्फ अर्जुन गणेश पाटील (वय २० वर्षे, रा. गांधीनगर, कोपरगाव), सुदाम ऊर्फ दिपक भास्कर खामकर (वय- २८, रा. मांडवे खुर्द ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांचेविरुध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कोपरगाव शहर, घारगाव, श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अंतीम निर्णय घेवून तिघांना दि.०६ सप्टेंबर २०१९ रोजी पासून एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले  आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post