वेब टीम : दिल्ली केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी 12 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा ...
वेब टीम : दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी 12 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासोबतच हरयाणामध्येही निवडणुका होणार आहेत. तिथल्या निवडणुकीच्याही तारखा आज जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांशिवाय झारखंडमध्येही निवडणुका होणार आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये ऑक्टोबर महिन्यात तर झारखंडमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
थोड्याच वेळात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये तारीख जाहीर करुन आचारसंहिता लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
COMMENTS