वेब टीम : कोलकाता भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेल्या चांद्रयान-२चा महत्त्वाचा टप्पा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यानाचे लँडर...
वेब टीम : कोलकाता
भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेल्या चांद्रयान-२चा महत्त्वाचा टप्पा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
यानाचे लँडर येत्या काही तासांत चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र यावरुन सरकारवर टीका केली आहे.
‘देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकार चांद्रयान-२चा वापर करीत आहे’ असा आरोप त्यांनी केला.
कोलकाता विधानसभेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘केंद्रातील मोदी सरकारकडून चांद्रयान-२चा प्रचार अशा पद्धतीने सुरु आहे, की ते सत्तेत येण्यापूर्वी भारताने कधीही अंतराळ मोहिमेचे नेतृत्व केलेच नाही.
देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला लपवण्यासाठी केंद्र सरकार चांद्रयान-२ मोहिमेचा वापर करीत आहे.’