मिताली राज आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त


वेब टीम : दिल्ली
भारताची स्टार क्रिकेटर मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजने मंगळवारी यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली.

मितालीने सांगितले, की "2006 पासून टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व केल्यानंतर या फॉरमॅटमधून संन्यास घेत आहे. त्यामुळे, मला 2021 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या तयारीवर लक्ष केंद्रीत करता येईल." टी-20 च्या 89 सामन्यांत मितालीने सर्वाधिक 2364 धावा काढल्या आहेत.

मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मिताली राजने ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्त्व केलं.

यामध्ये २०१२ (श्रीलंका), २०१४ (बांगलादेश) आणि २०१६ (भारत) या तीन टी-२० विश्वचषकांचा समावेश आहे. मिताली राजच्या नेतृत्त्वात भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात मात्र अयशस्वी ठरला.

मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post