पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या औरंगाबादमध्ये; 'या' मोठ्या प्रोजेक्टचे उदघाटन


वेब टीम  : औरंगाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यादरम्यान औद्योगिक क्षेत्राचे (एयूआरआयसी) उद्घाटन करणार आहेत.

 यावेळी ते महिला बचत गटांनी संबोधित करतील. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

एसएचजीच्या राज्यभरातील एक लाखांहून अधिक महिला या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीची पावले उचलली जात आहेत.

 यासाठी एक क्यूआरटी पथक, विशेष सुरक्षा रक्षक आणि रॅपीड ऍक्शन फोर्स बलाचा समावेश आहे.

याशिवाय अतिरिक्त बॉम्ब रोधक पथक आणि अग्निशमन दलाचा कार्यक्रम ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post