दिवाळीच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प येणार मुंबईच्या दौऱ्यावर; काय आहे उद्देश वाचा...


वेब टीम : मुंबई
अमेरिकेतील बास्केटबॉलची सर्वात मोठी व्यावसायिक स्पर्धा ‘एनबीए’ च्या भारतातील पहिला सामना यंदा आॅक्टोबरमध्ये मुंबईत खेळला जाणार आहे.

या सामन्याला आपण उपस्थित राहण्याची शक्यता आहे असे अमरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ह्युस्टन येथील ‘हाऊडी’ कार्यक्रमात जाहीर केले.

ही घोषणा करताना ट्रम्प म्हणाले, ‘‘लवकरच भारताला आणखी एक जागतिक दर्जाचे अमेरिकन प्रॉडक्टचा आनंद घेता येणार आहे ते म्हणजे एनबीए बास्केटबॉल!

हे ऐकायला छान वाटतेय. पुढील आठवड्यात हजारो मुंबईकर एनबीएचा भारतातील सर्वात पहिल्या सामन्याचा आनंद घेतील.

त्यासाठी मी आमंत्रित आहे का, मिस्टर प्राईम मिनिस्टर? मी येऊ शकतो, लक्ष ठेवा, मी येऊ शकतो.’

एनबीएचे प्री सीझन सामने ४ व ५ आॅक्टोबरला सॅक्रेमेंटो किंग्ज आणि इंडियन पेसर्स संघादरम्यान खेळले जाणार आहेत.

मुंबईतील एनएससीआय, एसव्हीपी स्टेङीयम येथे हे सामने खेळले जाणार आहेत.

एनबीए ही बास्केटबॉलची सर्वात मोठी व्यावसायिक लीग असून अमेरिका व कॅनडात ३० संघादरम्यान त्याचे सामने होत असतात.

एनबीएचा सामना आयोजनाची संधी मिळणारा भारत हा आशियातील तिसरा देश ठरणार आहे. याआधी चीन व जपानमध्येही एनबीएचे प्री-सिझन सामने झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post