वेब टीम : जम्मू पाकिस्तानी सैनिक भारतीय लष्कराच्या हल्लात ठार झाले. याच सैनिकांचे मृतदेह मागण्यासाठी पाकिस्तानने पांढरे निशाण फडकावल्या...
वेब टीम : जम्मू
पाकिस्तानी सैनिक भारतीय लष्कराच्या हल्लात ठार झाले. याच सैनिकांचे मृतदेह मागण्यासाठी पाकिस्तानने पांढरे निशाण फडकावल्याची घटना नियंत्रण रेषेजवळ (LOC) घडली.
जम्मू काश्मीर येथील हाजीपूर भागात भारतीय सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले.पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत गोळीबार केला.
भारतीय लष्कराने त्याचे चोख प्रत्युत्तर दिले आणि दोन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला.
या दोन जवानांच्या मृतदेहांची मागणी करत पाकिस्तानी लष्कराने पांढरे निशाण फडकवले आणि हे दोन मृतदेह घेऊन गेले.
ही घटना ११ सप्टेंबर रोजी घडली आहे. या संदर्भातला व्हिडीओ एका वृत्तसंस्थेने ट्विट केला.पाकिस्तानी सैनिकांचा दोन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने खात्मा केला.
मात्र त्यांचे मृतदेह नेण्यास पाकिस्तानने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र शुक्रवारी म्हणजेच १३ सप्टेंबरला पांढरे निशाण दाखवत पाकिस्तानी लष्कराने सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानात नेले.
COMMENTS